आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे घसरलेले तापमान दोन दिवसांपासून पुन्हा वाढले आहे. बुधवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४१ अंश तापमानाची नोंद कृषी संशोधन कार्यालयाने केली. लवकर तापमान ४३ अंशांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. मार्च महिन्यात तब्बल चारवेळा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने जिल्ह्याला यंदा उशिराने तापमानवाढीला सामोरे जावे लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील ढगाळ वातावरण तयार झाल्याने ३८ अंशांपर्यंत गेलेले तापमान ३५ अंशांपर्यंत खाली घसरले होते. मात्र, हे तापमान निवळताच केवळ दोन दिवसांत पाऱ्याने उसळली घेतली. बुधवारी तर यंदाच्या उन्हाळी मोसमातील सर्वाधिक ४१ अंश तापमान नोंदवले गेले. यामुळे यवतमाळकरांच्या अंगाची लाही लाही करणारा ठरला. किमान तापमानदेखील २४ अंशावर गेल्याने उकाड्यात भर पडली. दरम्यान, कमाल तापमानाचा पारा वाढून लवकरच ४३ अंशांपर्यंत तापमान वाढण्याची भिती आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम होऊन उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
शीतपेयांची वाढली मागणी गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढताच उकाड्याने जीवाची तगमग होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिव्हाला थंडावा देणाऱ्या शीतपेयाची आता मागणी वाढू लागली आहे. निंबू शरबत, रसवंती, आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. तर मार्केट मध्ये विक्रीसाठी आलेल्या टोप्या, मातीचे माठ, स्कार्फ उन्हाळ्याची चाहूल देत आहेत.
गेल्या वर्षीची स्थिती गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी तापमान ४० अंश एवढे नोंदवले गेले होते. यानंतर वातावरणातील बदलाने तापमान घसरले होते. मात्र, १४ मार्च २०२२ रोजी ते ३९.७ आणि त्यानंतर तिसऱ्याच दिवशी १६ मार्चला तापमान तब्बल ४२.९ अंश एवढे नोंदवले गेले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.