आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी, इच्छुकांची उडणार एकच झुंबड ; अध्यक्षांचे आरक्षण जाहीर

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. असे असले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले असून, जिल्हा परिषद अध्यक्षांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. तर अध्यक्षांच्या लोभापायी इच्छुक उमेदवारांची निवडणुकीत एकच झुंबड उडण्याची चिन्हे आहेत.

कोरोना-१९ चा वाढलेला संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाच्या वांदेवाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विहित मुदतीत होवू शकल्या नाही. अशात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपुष्टात आला. तद्नंतर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला. त्याचप्रमाणे वाढलेली लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर जिल्हा परिषदेचे ६९ गट आणि पंचायत समितीचे १३८ गणांच्या निश्चितीवर आयोगाने शिक्कामोर्तब केला होता. तद्नंतर गट, गणाचे आरक्षणसुद्धा जाहीर झाले होते. मात्र, राज्यात झालेल्या सत्तातंतरानंतर नव्या सरकारने सन २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

या आदेशामुळे नव्याने काढलेले गट, गणाचे आरक्षण रद्द झाले आहे. आता पूर्वीचे ६१ गट आणि १२२ गणांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहे. मात्र, सध्यातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नाही, परंतू जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित निघाले आहे. पूढील अडीच वर्षांकरिता आरक्षण राहणार आहे. सध्यातरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला नाही. मात्र, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण शासनाने परिपत्रकानुसार जाहीर केले. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कंबर कसून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचे आरक्षणाकडे लक्ष लागले होते. आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची एकच झुंबड उडण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविल्या जात आहे.

सहा महिन्यांपासून प्रशासक राज
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेची चावी मार्च महिन्यात आली. आता सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला. तद्नंतर कामकाजात गतीमानता आली आहे, परंतू बहुतांश विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. आता निवडणुका कधी होणार ह्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...