आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप‎:माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील‎ यांच्याकडून लोकशाहीची हत्या‎

यवतमाळ‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठल्याही ‎राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र असं असतानाही ‎माजी गृहराज्यमंत्री तथा पदवीधर‎ आमदार डॉ. रणजीत पाटील‎ यांच्याकडून लोकशाही मूल्यांना‎ पायदळी तुडवून थेट लोकशाहीची‎ हत्या करण्यात आल्याची गंभीर‎ टीका, इसा संघटनेचे सचिव श्याम प्रजापती यांनी रविवार, दि. २०‎ नोव्हेंबरला आयोजित पत्रकार‎ परिषदेत केली. पाटील यांच्याकडून‎ पोलिस व शासकीय यंत्रणांचा ही‎ गैरवापर होत असल्याचा आरोपही‎ त्यांनी केली आहे. शहरातील‎ शासकीय विश्राम भवन येथे रविवारी‎ ईसा संघटनेचे सचिव श्याम प्रजापती‎ यांच्याकडून पत्रकार परिषद‎ आयोजित करण्यात आली होती.‎

पुढे बोलतांना श्याम प्रजापती‎ म्हणाले की, पदवीधर आमदार डॉ.‎ रणजीत पाटील यांनी त्यांच्या बारा‎ वर्षाच्या काळात कुठलेही ठोस काम‎ केले नाही. ही बाब लक्षात घेता पाचही‎ जिल्ह्यातून पदवीधरांचा निर्माण‎ होणारा रोष पाहता दि. ८ नोव्हेंबरला‎ आ. पाटील यांनी बारा वर्षात केलेल्या‎ कामांची माहिती प्रजापती यांच्याकडून‎ रणजीत पाटील यांना मागवण्यात‎ आली होती. मात्र त्याला कोणताही‎ प्रतिसाद देण्यात आला नाही.‎ परिणामी त्यांच्यासह असंख्य‎ युवकांनी दि. १५ नोव्हेंबरला आ.‎ रणजीत पाटील यांच्या अकोला येथील‎ निवासस्थानासमोर जवाब दो‎ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

‎त्यानुसार अकोला येथील गांधी‎ जवाहर बाग येथून जवाब दो‎ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.‎ दरम्यान गांधी जवाहर बाग येथे‎ सकाळी ११ वाजता देशभक्तीपर गीत‎ गायन व पथनाट्य सुरू असताना‎ अकोला पोलिसांनी बळजबरी करून‎ शाम प्रजापती यांच्यासह शेकडो‎ युवकांना घटनास्थळावरून स्थानबद्ध‎‎ ‎करत कोतवाली ठाण्यात डांबून ठेवले.‎ लोकशाही मार्गाने पाटील यांना निवेदन‎ देण्यासाठी गेलेल्या पदवीधरांना‎ अशाप्रकारे पोलिसांकडून दमदाटी‎ करणे, निवेदन देण्यापासून अटकाव‎ करणे ही बाब लोकशाही मूल्यांना‎ पायदळी तुडवणारी आहे.

असा‎ आरोप शाम प्रजापती यांनी केला आहे.‎ पदवीधरांसाठी प्रश्न विचारण्याकरिता‎ जाणाऱ्या युवकांना जर अशा प्रकारे‎ त्रास दिला जात असेल तर पाचही‎ जिल्ह्यातील युवकांनी याविरुद्ध‎ आवाज उठावावा, असे आवाहनही‎ श्याम प्रजापती यांनी केले आहे.‎ पत्रकार परिषदेला इसा संघटनेचे‎ अध्यक्ष डॉ.प्रवीण बारंगे, हरिश्चंद्र‎ प्रसाद यांच्यासह अन्य उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...