आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजूदास जाधव यांचा भटक्या जाती/विशेष मागास प्रवर्गातील अर्ज अपात्र करावा, असा आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचा अर्ज अपात्र ठरविला. या संदर्भात त्यांना पुढील तीन दिवसांत अपील करता येणार आहे. त्यामुळे भटक्या जाती/विशेष मागास प्रवर्गातून नेमकं कुणाच्या अर्जावर शिक्कामोर्तब होईल, ही येणारी वेळच सांगेल. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीतची निवडणूक ३ जुलै रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली होती. सोमवार, दि. ६ जून रोजी नामनिर्देशन छाननी होती. तो पर्यंत २४६ उमेदवारांचे अर्ज कायम होते. तर सात उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार, दि. ७ जून रोजी पर्यंत २३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आता २१ जून पर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. तद्नंतर लगेच दुसऱ्या दिवशी निशाणीचे चिन्हे वाटप केले जाणार आहे. अशात पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजूदास जाधव यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता, उपविधी क्रमांक फ़-१ मधील टिप क्रमांक एक नुसार अपात्र करावे, असा अर्ज तुळसीदास आत्राम यांनी दाखल केला होता. या आक्षेपांची तपासणी केली असता, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष प्रवर्गातील अर्ज अपात्र ठरविण्यात आला, परंतू आता ठेवीदाराचा प्रतिनिधी मतदार संघातून त्यांचा अर्ज कायम आहे. यासोबत इतरही काही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.