आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार:‘रोहयो’च्या कामावर माजी सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह शिपाई, दिव्यांग व्यक्ती मजूर

अंजनगाव सुर्जी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गावंडगाव बु. येथील एका रोजगार सेवकाने कामाचे बिल काढण्याकरिता माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिपाई व गावातील एका दिव्यांग व्यक्तीचे मजूर म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर नाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने अंजनगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील गावंडगाव बु. येथे रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर स्थानिक रोजगार सेवकाने बिल काढण्याच्या उद्देशाने सिमेंटच्या रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून माजी सरपंच प्रकाश बुलाजी भदे, कमल प्रकाश भदे, दिव्यांग व्यक्ती शिवदास सदाशिव भदे, ग्रा. पं. शिपाई गजानन गुणवंत फसाले, जयश्री गजानन फसाले आदींसह गावातील काही नागरिकांची नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मस्टरवर मजूर म्हणून टाकल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान रोजगार सेवकाने िबलाची रक्कम हडप करण्यासाठी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरीच्या कामावर मजूर नसताना रोजगार सेवकाने केलेला प्रकार अतिशय गंभीर असून सदर रोजगार सेवकाला मस्टर करिता खाते क्रमांक कोणी दिला, असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय याबाबत ग्रामसेवकाला कसे माहीत नाही, असा प्रश्नही गावंडगाव येथील नागरिकांना पडला आहे. रोजगार हमी योजनेवरील या गैरप्रकाराबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावंडगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...