आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाइटर प्लेन:यवतमाळच्या रन वे वर पहिल्यांदाच उतरले चार फाइटर प्लेन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सेनेतील शौर्याचे प्रतीक असलेले चार फाइटर प्लेन शनिवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास पहिल्यांदाच यवतमाळ येथील भारी परिसरातील जवाहरलाल दर्डा विमानतळावरील ‘रन वे’ वर उतरले. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘माइक्रोलाइट अभियान’ अंतर्गत गया ते बंगळुरू असा त्यांचा प्रवास सुरू आहे. तरुणांना मध्ये भारतीय सैन्य व देशाभिमान जागृत करणारी माहिती यावेळी दिली जात आहे. राज्यातील केवळ तीन जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

भारतीय सेनेचे मायट्रोलाईट फ्लाइंग अभियान राबवण्यात येत आहे. गया येथून निघालेले चार विमानाने यवतमाळ शहरालगत असलेल्या भारी येथील विमानतळावर लँडिंग केले. माइक्रोलाइट फ्लाइंग सैन्याच्या साहसिक खेळांमध्ये माहिर आहे, यवतमाळ विमानतळावर शनिवारी बहाद्दर सैन्य अधिकाऱ्यांची तरुणांसह अनेकांनी भेट घेतले. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. यावेळी टीम लीडर कर्नल लक्ष्मीकांत यादव, कर्नल डी एस फणसाळकर, अन्य अधिकाऱ्यांनी बच्चे कंपनीला चॉकलेट्स देऊन त्यांना भारतीय सैन्य व देशाभिमान जागृत करणारी माहिती दिली. यावेळी कर्नल राहुल मनकोटींया, लेफ्टनंट कर्नल बीपी सिंग, नायक प्रदीप सिंग, विजय यादव, एसईपी अनेशा पा, एसईपी अरुण पन्डीं, एसईपी परमजित, एसईपी नविन यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनात दिसला निरूसाह भारतीय सेनेचे मायट्रोलाईट फ्लाइंग अभियान राबवण्यात येत आहे. गया येथून निघालेले चार विमानाने शहरालगत असलेल्या भारी येथील विमानतळावर लँडिंग केले. याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने महाविद्यालयातील एनसीसी स्टुडंट्स ला सुचविणे गरजेचे होते. मात्र, मोजकेच विद्यार्थी उपस्थित असल्याचे दिसून आले.

माइक्रोलाइट अभियान’ देशसेवा व यासाठी जनजागृती करीता बोध गया वरुन आर्मी व वायु सेनेच्या वतीने हा हवाई अभियान सुरु करण्यात आला आहे. ही चार लाइट एअरक्राफ्ट विमाने व पायलटसची टीम तब्बल पाच हजार किलोमीटर हवाई यात्रा टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार आहे. येत्या काही दिवसानंतर कर्नाटक राज्यातील बेंगळूरु येथे या एयर क्राफ्टचा बेड़ा पोहचणार आहे. तेथून पुन्हा बोध गया रिटर्न्स होईल.

बातम्या आणखी आहेत...