आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वाटखेड खुर्द येथे बुधवार, दि. ११ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागुन चार घरे, दोन बैलांसह दोन दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी भेट देवुन नुकसानीची पाहणी केली.
वाटखेड खुर्द येथील गजानन राऊत यांचे घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. घरातील मंडळींनी बाहेर येवुन आरडाओरडा केला. या आगीत गजानन राऊत यांचे घराला लागून बांधून असलेले दोन बैल मृत्युमुखी पडले. आगीने लगतच्या विष्णु राऊत, शरद राऊत, श्रावण शिवरकर यांच्या घरांनाही विळखा घातला.
यात चारही घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. तर विष्णु राऊत यांच्या दोन दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या. नागरिकांनी तात्काळ धाव घेवुन घरांवर पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. लिहीपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.