आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सेलला यश:ऑनलाइन फसवणुकीतील चौघांचे पैसे परत मिळवले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील चौघांचे पैसे परत आणण्यात सायबर सेलला यश आले. यात तिघांची एनी डेक्स अॅप डाऊनलोड करून तर एकाची हॉटेल बुकिंग करतांना फसवणूक झाली होती. या चार प्रकरणात सायबर सेलने ५८ हजार रूपये परत आणले आहे.जिल्ह्यातील तीन व्यक्तींना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फसवणुकीचे कॉल येत होते. यावेळी अनोळखी व्यक्ती तक्रारदार यांच्याशी संभाषण करीत एक लिंक पाठवत होता. त्यानंतर मोबाईलमध्ये एनीडेक्स ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ते मोबाईलमध्ये एक्सेस करून त्याद्वारे बँक खात्यातून पैसे वळते करत होते.

या प्रकरणी तिघांनी फसवणूक झाल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच एका व्यक्तीने शिर्डी येथे हॉटेल बुकींगकरीता गूगलवर भक्त निवास संपर्क क्रमांक सर्च केला होता. यावेळी त्यांना त्यावर एक मोबाईल नंबर दिसला. दरम्यान त्या नंबरवर फोन करून हॉटेल बुकींगकरीता पैसे जमा केले. मात्र हॉटेल बुकिंग झालेच नव्हते. ही बाब काही वेळानंतर लक्षात येताच त्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात धाव घेवून फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. या चार प्रकरणात तब्बल एक लाख ५६ हजार रूपयाची फसवणूक झाली होती.

या चारही प्रकरणात सायबर सेलला ५८ हजार रूपये परत आणण्यात यश आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विकास मुंढे, पथकातील अजय निंबोळकर, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे, अभिनव आदींनी पार पाडली.

असा प्रकार घडल्यास १९३० वर साधा संपर्क
अनेकांना लॉटरी, जॉब ऑफर, इलेक्ट्रिक बिल, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन लोन किंवा ५ जी अपडेट आदी मोबाईल नंबरवरून कॉल येत आहे. अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी कॉलला प्रतिसाद देवू नका, किंवा कोणत्याही लिंकवर खात्री झाल्याशिवाय सर्च केलेल्या मोबाईल क्रमांकावर खात्री झाल्याशिवाय क्लिक करू नये, दुर्देवाने आपल्यासोबत सायबर क्राइमचा प्रकार घडल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा.- विकास मुंढे, एपीआय, सायबर सेल, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...