आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:बारमध्ये चार तरुणांची दारूच्या नशेत तोडफोड, बार चालकाला मारहाण

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारमध्ये चार तरुणांची दारूच्या नशेत तोडफोड करीत बार चालकाला मारहाण केली. ही धक्कादायक घटना शहरातील धामणगाव मार्गावर असलेल्या हॉटेल मायाकांत बारमध्ये बुधवार, दि. २ नोव्हेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी बार चालक पंकज जयस्वाल वय ४५ वर्ष रा. यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी त्या अनोळखी चौघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील धामणगाव मार्गावर पंकज जयस्वाल यांचे हॉटेल मायाकांत म्हणून बार आहे. बुधवारी त्यांच्या बारमध्ये चार २० ते २५ वयोगटातील तरूण मद्यप्राशन करीत बसले होते. त्यानंतर काही वेळातच दारूच्या नशेत टेबलावरील ग्लास खाली आपटून फोडू लागले. त्यामूळे पंकज जयस्वाल यांनी त्यांच्याजवळ जावून ग्लास का फोडत आहे म्हणून जाब विचारला.

यावेळी त्या चौघांनी संगनमत करून तु हमको पहेचानता नही क्या, तुने हमको बोला कैसे म्हणून वाद निर्माण केला. दरम्यान काऊंटरमागे असलेल्या रॅकवर ग्लास मारून रॅकच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच एलईडी देखील फोडून नुकसान केले. त्यानंतर पंकज जयस्वाल याला मारहाण केली. यावेळी हॉटेलमधील मॅनेजर, नोकर वर्गाने धाव घेवून मध्यस्ती केल्याने त्या चौघांनी दुचाकी घेवून पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...