आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रमदानाचा चौथा रविवार ग्राम संवाद ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमाला ५ फेब्रुवारी रोजी गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोबतच गावकऱ्यांनी ग्राम संवाद ग्रुप मधील सतत कार्य करणाऱ्या युवकांचे मनोबल वाढविले. गावकऱ्यांनी ग्राम संवाद ग्रुपतर्फे चालू असलेल्या अनोख्या पद्धतीने श्रमदान हे खरोखरच खूप गरजेचं आहे असे गावकरी श्रमदान करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सूरज टोंगे यांनी या उपक्रमाअंतर्गत त्यांचा ट्रॅक्टर खड्डे बुजवण्यासाठी मुरूम आणण्यासाठी दिला.
ओमकार शेलुकार यांनी शेतातील मुरूम रस्त्या वरील खडे बुजवण्यासाठी मुलांना दिला. तसेच लागेल तेव्हा तुम्ही या श्रमदानाच्या कामासाठी नेऊ शकता असे आश्वासन दिले. खरोखरच या उपक्रमाच्या माध्यमातून बरेच काही खास गोष्टी शिकायला मिळाल्याचे युवकांमध्ये बोलल्या जात आहे. यावरून जर मनामध्ये काही करण्याची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. मनामध्ये ती प्रबळ इच्छाशक्ती हवी असायला पाहिजे.यावेळी चरण चव्हाण, रुपेश राठोड, योगेश राठोड, संदीप राठोड, रिकेश राठोड, अमोल राठोड, नाना इनवाते, साहिल चव्हाण, अनिल जाधव, लखन जाधव, धनराज जाधव आदी गावातील युवा उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.