आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून दोघांची तब्बल साडे चार लाखाने फसवणूक करण्यात आली. ही घटना घाटंजी शहरातील सहयोग नगर स. पतसंस्थेत घडली असून दोघांनी घाटंजी पोलिस ठाण्यात दिलेल्या वेगवेगळ्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद गवळी रा. सायखेडा याच्यासह के.डी मडावी, प्रमोद पंजाबराव भुरघाटे, संतोष देविदास कर्नेवार, सुरेश दशरथ पवार, सुभाष जयवंतराव चौधरी, सुधाकर अजाबराव भोयर, पवन वासुदेवराव निबुदे, अनिता दामोदर व-हाडे, एस पी लाकडे, शीतल अभय कटमवार, पंजाब एस महाकाळकर आदींवर फसवणुकीचे गुन्हे नोंद केले आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, घाटंजी शहरातील जला राम मंदिर परिसरातील केशव गोल्लर यांना सहयोग नगर सं. पतसंस्थेतील विनोद गवळी यांच्यासह अन्य बारा जणांनी इतर आर्थीक संस्थेपेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यावेळी गोल्लर यांच्याकडून ३ लाख ७३ हजार ७१९ रूपये घेवून दि. १७ नोव्हेंबर २०१४ ते दि. ४ डिसेंबर २०२२ दरम्यान त्यांची आर्थीक फसवणूक केली. त्याचबरोबर घाटंजी शहरातीलच रामराव नगराळे यांना देखील अश्याच प्रकारे आमिष दाखवून त्यांच्याकडून ८६ हजार ३८ रूपये घेवून दि. २९ ऑगस्ट २०१४ ते दि. ४ डिसेंबर २०२२ दरम्यान आर्थीक फसवणूक करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी वेगवेगळ्या तक्रारीवरून घाटंजी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंद करण्यात आले. यात सहयोग नगर सं. पतसंस्था मर्या घाटंजी रं.न.९०६ येथील विनोद गवळी याच्यासह बारा जणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.