आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीमंडी मित्र परिवाराचा उपक्रम:महालक्ष्मीनिमित्त पाच हजार नागरिकांना १६ भाज्यांचे मोफत वितरण ; गेल्या ९ वर्षांपासून सुरू केले कार्य

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात गौरी म्हणजेच महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी महालक्ष्मीची स्थापना होते. या सणादरम्यान महालक्ष्मीच्या प्रसादामध्ये १६ भाज्यांचे विशेष महत्त्व असते. याच १६ भाज्यांचे मोफत वितरण भाजी मंडी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे ५ हजारांपेक्षा अधीक नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने भाज्यांचे वितरण करण्यात आले.

यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. स्थानिक स्तरावर त्यास महालक्ष्मीचा सण म्हणून संबोधले जाते. या सणाच्या निमित्ताने दरवर्षी भाजी मंडई मित्र परिवाराच्या वतीने महालक्ष्मीच्या प्रसादात महत्व असलेल्या १६ भाजी साठी १६ प्रकारच्या भाज्यांचे मोफत वितरण करण्यात येते. गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाही भाजी मंडईमध्ये १६ भाज्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यामध्ये पालक, अंबाडी, तेंडुळे, भेंडी, बरबटी, शीमला, पत्ता कोबी, हरसुल, पडुळ, फुल कोबी अशा भाज्यांचा समावेश होता.

भर पावसात वाटप सुरू
यंदा महालक्ष्मीच्या निमित्ताने भाजी मंडी परिसरात मोफत भाज्यांचे वितरण सुरू असताना अचानक दमदार पाऊस सुरू झाला. या पावसामध्येही भाजी वाटप करणाऱ्या सदस्यांनी वितरण सुरू ठेवले. तर रांगेमध्ये असलेल्या नागरिकांनीही पावसातच रांगेत उभे राहुन भाजी घेतली. सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसातही भाजीचे वाटप सुरू होते हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...