आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डिसेंबरपर्यंत मिळेल मोफत धान्य

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात धान्य दिले जाते. अशातच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरजू कुटुंबांना दिले जाणारे मोफत धान्य ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्याला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा प्राधान्य, अंत्योदय कुटुंबांसह इतर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ लाख ८८ हजार ९४९ लाभार्थींना मोफत धान्य मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली.

जिल्ह्यात २ हजार ०४१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या १ लाख २९ हजार ३९८ एवढी आहे. यामधील लाभार्थी संख्या पाच लाख ९ हजार ८४ एवढी आहे. तर प्राधान्य गटातील कार्डाची संख्या ३ लाख ५९ हजार ५५१ एवढी असून लाभार्थी संख्या १४ लाख ४१ हजार ५६१ एवढी आहे. या कार्डधारकांना मोफत धान्य देण्यासाठीची मुदत शासनाने वाढवून डिसेंबर अखेरपर्यंत केल्याने गरीबांना आता पोटाला आधार मिळाला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अत्योंदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारण करणाऱ्या कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे वितरण केले जाते. ३१ डिसेंबरपर्यंत तांदुळ, गहु मोफत वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या परिमाणानुसार गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप होईल. दरम्यान जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात दिवाळी झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना लाभ
गरीब कल्याण अन्न योजनेतून जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींचा यात समावेश करण्यात आला आहे. कार्ड धारक संख्या कमी असली तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो प्रमाणे हे धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी

बातम्या आणखी आहेत...