आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेशनधारकांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य; प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ, गरजूंना दिलासा

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभधारकांना येत्या सप्टेंबरपर्यंत दर महिन्याला प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना गटातील एकुण ५ लाख ८३ हजार ६२४ शिधापत्रिका धारकांना मोफत गहु व तांदुळ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गरीब आणि गरजू नागरिकांना पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२१ मध्ये घेतला होता. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर केंद्र सरकारने मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

परंतु आता या योजनेला सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पाच किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...