आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी:आजपासून थंडी पुन्हा परतणार; दोन आठवडे कडाक्याचे संकेत

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून २१ अंश सेल्सियसच्या उच्चांकावर असलेले किमान तापमानात रविवारी किंचित घट होऊन पारा १७.३ अंशांवर आला. काही अंशी ढगाळ वातावरण निवळल्याने तापमानात घसरण होऊन थंडी वाढते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून तापमान कमी होऊन थंडी परत येईल. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका वाढू शकतो.

गेल्या आठवड्यात प्रथमच जिल्ह्यात किमान तापमान २१.९ अंशाच्या उच्चांकावर गेले होते. दिवसा ३३ अंशांपर्यंत हा उच्चांक होता. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढलेला होता. जिल्ह्यात ११ ते १६ डिसेंबरपर्यंत ही स्थिती कायम होती. आता ढगाळ वातावरण निवळले आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होत आहे. सोमवारपासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळू शकते. असे झाल्यास किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट होऊन पारा १४ ते १५ अंशांपर्यंत खाली येईल. परिणामी थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे. रविवारी किमान तापमान १७.३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सियसवर होते. कमाल तापमान उच्चांकी पातळीवर म्हणजे डिसेंबर महिन्यातील सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सियसने अधिक होते. त्यामुळे दिवसा देखील उकाडा जाणवत होता.

उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने चिंता कायम ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग कमी असल्याने उत्तरेतील थंड वाऱ्याचा जोर ओसरला होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडी कमी झाल्याचे जाणवत होते. आता आकाश निरभ्र झाले असून वाऱ्याचा वेग वाढून दिशाही बदलते आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा उत्तरेतील थंड वाऱ्याचा जोर वाढू शकतो. या महिनाअखेरीपर्यंत थंडीत वाढ होईल. जानेवारीत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...