आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन, भाजीपाला अनुदान:इंधन, भाजीपाला अनुदान रखडले

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय पोषण आहार योजनेतून देण्यात येणारे इंधन, भाजीपाला अनुदान काही तालुक्यातील शाळांना अद्यापर्यंत भेटलेच नाही. शाळांचे बँक खाते अपडेट नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. रखडलेले अनुदान वितरीत करण्याच्या दृष्टीने शालेय पोषण आहार विभागाच्या वतीने शिक्षण संचालनालयाला पत्रव्यवहार केला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील ४३ शाळांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बरेच दिवस विद्यार्थ्यांना थेट तांदूळ दिल्या जात होते. मध्यंतरी संपूर्ण निर्बंध उठल्यानंतर शाळेत आहार शिजवून देण्यास सुरूवात झाली. त्यासाठी इंधन, भाजीपाला अनुदान नियमित मिळणे गरजेचे आहे, परंतू बहुतांश शाळांना अनुदान वितरणाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळांचे खाते अपडेट नसल्याच्या कारणाहून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनुदान मिळाले नसल्यामुळे मुख्याध्यापकांना संपूर्ण व्यवहार उधारीवरच करावा लागत आहे. ज्या शाळांना अनुदान मिळाले ते सुद्धा अत्यल्प असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यंतरी काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिली होती. या माहितीच्या आधारावर शालेय पोषण आहार विभागाच्या वतीने शिक्षण संचालनालयाला अनुदान वितरीत करण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे भाजीपाला अनुदानासाठी सुद्धा बराच विलंब झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...