आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मागणी:माळकिन्ही येथील पुल बांधण्यासाठी नाबार्ड अंतर्गत मंजुरी देऊन निधी द्या

महागाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळकिन्ही येथे स्मशानभुमित जाण्यासाठी रस्त्यात असलेल्या नाल्यावर पुल बांधण्यासाठी नाबार्डमधून मंजुरी देवुन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार नामदेवराव ससाणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील अविनाश कलाने (४०) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान दि. ५ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. त्यादिवशी दिवसभर पाऊस असल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभुमित (नाल्याच्या काठावर असलेल्या दहनशेड) जाण्यासाठी रस्ता किंवा पुल नसल्याने नाल्याच्या पुरातून वाट काढत मृतदेह स्मशानभुमित नेला हा प्रकार गंभीर असल्याने लोकप्रतिनिधींचे याकडे असलेले दुर्लक्ष व उदासीन धोरण याला जबाबदार असल्याचे वृत्त दै. दिव्य मराठीने दि. ८ सप्टेंबरला प्रकाशित केले होते.

याचीच दखल घेवुन उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार नामदेवराव ससाणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक पत्र देवुन माळकिन्ही येथील स्मशानभुमित जाण्यासाठी नाल्यावर पुल व रस्ता नाबार्ड मधुन मंजुर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मतदार संघातील एक नाही तर अनेक ज्वलंत समस्या तोंड काढून उभ्या असुन अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे लोकप्रतिनिधी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने माध्यमांना किंवा सामाजिक संघटना यावर आवाज उठवून असे मुद्दे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणुन द्यावे लागत असल्याने लोकप्रतिनिधींचे नेमके कार्य व कर्तव्य काय आहे असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...