आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख‌ड्ड्यांमुळे अनेकांना दुखापत:गडकरी साहेब, माझ्या दोन मैत्रिणींचा याच रस्त्याने बळी घेतला

अमोल इंगोले | नांदगाव खंडेश्वर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माननीय श्री. नितीनजी गडकरी साहेब, अमरावती-यवतमाळ मार्गावर ख‌ड्ड्यांमुळे अनेकांना दुखापत झाली, तर कित्येकांना प्राणाला मुकावे लागले. माझ्या दोन शाळकरी मैत्रिणींचादेखील याच मार्गावरील खड्ड्यांनी बळी घेतला. आता मलाही भीती वाटते. कारण रोज याच मार्गाने मला शाळेसाठी ये-जा करावी लागते. हा महामार्ग तुम्ही लवकरात लवकर दुरूस्त कराल नं?, अशी भावनिक साद केवळ एक, दोन नव्हे, तर या मार्गावरील ३४ शाळांमधील जवळपास ८ हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांना लिहिलेल्या पत्रांद्वारे घातली आहे.

तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग सध्या त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू मार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावर असणाऱ्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. उत्तर व दक्षिण कॉरिडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राज्य सीमेवरील जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील नागपुरातील कार्यालयात पत्र पोहोचवले

अमरावती-यवतमाळ महामार्गावरील येणाऱ्या गावांमधील ३४ शाळांमधील जवळपास ८ हजार विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांना पत्रातून रस्त्यांबाबत भावनिक साद घातली आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात पोहोचते केले आहेत.
निकेत ठाकरे, समाजसेवक तथा तालुकाध्यक्ष भाजयुमो.

चार महिन्यांत तिघांचा बळी
या मार्गावर छोटे छोटे अपघात नित्याचीच बाब आहेत, परंतु मागील दोन महिन्यात ७ अपघात झाले असून, त्यात तिघांचा बळी गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.