आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगारांवर धाड:शारदा चौक, अप्सरा टॉकीज चौकातील जुगारांवर धाड

यवतमाळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शारदा चौक आणि अप्सरा टॉकीज चौकातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून एलसीबी पथकाने दहा जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरला करण्यात आली असून धर्मेंद्र उर्फ इंद्रपालसींग ठाकुर, यशवंत खोब्रागडे, राजू रामटेके, योगेश माहुरे, उमेश गुजर, सोनु बरोरे, अंकित सैनी, सूर्यभान राऊत, नंदलाल राऊत आणि विलास बरबटकर सर्व रा. यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जुगारींची नावे आहे.

शारदा चौक आणि अप्सरा टॉकीज चौक परिसरात मटका जुगार सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून शुक्रवारी एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी दहा जुगारींना ताब्यात घेवून रोख रक्कम, सहा मोबाईल, पाच दुचाकी असा एकूण १ लाख ६३ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल तर अप्सरा टॉकीज चौकात कारवाई करीत चार हजार ५४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...