आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड‌यावर धाड:भोसा बायपास मार्गावरील जुगारावर धाड, 5 ताब्यात

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंजीपत्ता जुगार अड्ड‌यावर धाड टाकून अवधुतवाडी पोलिसांनी पाच जुगारींना ताब्यात घेत अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार, दि. १७ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास शहरातील भोसा बायपास मार्गावरील एका हॉटेल समोर करण्यात आली. तेजस कदम वय ३३ वर्ष रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी, गोविंद शर्मा वय ४२ वर्ष रा. बालाजी पार्क, पिंपळगाव, शेख रफीक शेख सरदार वय ६० वर्ष रा. सारस्वत ले-आऊट, सय्यद समीर सय्यद अजीज वय २८ वर्ष रा. तारपूरा आणि आकाश कुळसंगे वय ३२ वर्ष रा. सुरज नगर, यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जुगारींची नावे आहे.

शहरातील भोसा बायपास मार्गावर असलेल्या जीएसटी ढाब्यासमोर गंजीपत्ता जुगार मोठ्या प्रमाणात सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी पाच जुगारी खेळतांना रंगेहाथ जुगार खेळतांना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, ३ मोबाईल, ४ दुचाकी, विदेशीसह दोन लाख ४२ हजार १४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील निराळे, पथकातील जमादार गजानन वाटमोडे, गजानन दुधकोहळे, सुरेश मेश्राम, समाधान कांबळे, नितीन सलाम, सागर चिरडे, प्रशांत राठोड, सुरज शिंदे, धनंजय कोटपल्लीवार यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...