आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:विवेकानंद विद्यालयात पर्यावरणपूरक मातीचे गणपती कार्यशाळा व प्रदर्शन

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयामध्ये पर्यावरणपूरक मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासोबतच ‘माझे घर- माझा गणपती’ या उपक्रमांतर्गत हरित सेनेने ही कार्यशाळा आयोजित केली होती. शाळेतील कला शिक्षक प्रवीण जिरापुरे आणि हरित सेना प्रभारी तथा संगीत शिक्षक पूर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात विविध वर्गतुकड्यांतील २१ कलावंत विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. तयार झालेल्या पर्यावरणपूरक मातीच्या गणपतींचे प्रदर्शन मंगळवार, दि. ३० ऑगस्ट रोजी शाळेत भरवण्यात आले. यावेळेस शाळेतील संपूर्ण विद्यार्थी व शिक्षकांसमोर गणपती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यामध्ये प्रथम बक्षीस साहिल ओमप्रकाश बोंडे, द्वितीय हिमांशू मस्के, तृतीय दीप अरुण वानखडे, तर प्रोत्साहनपर बक्षीस संदीप बहादूर पून, साहिल विवेक लांजेवार, कार्तिक मंगेश मंगाम यांना देण्यात आले. परीक्षण शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विवेक अलोणी यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख संतोष पवार, प्रीती चौधरी व दिनेश गहरवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन करून मुलांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातील गणपतींचे अवलोकन केले. अशा प्रकारचा गणपती स्वतः तयार करून त्याचीच स्थापना आपापल्या घरी करण्याचा संकल्प या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...