आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सव साजरा:सीएमसीएस येथे गणेशोत्सव उत्साहात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील ८ वर्षांपासून कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, यवतमाळ गणेश उत्सव साजरा करत आहे. या वर्षी सुद्धा गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गणेश मूर्तीची स्थापना दि. ३१ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली. दोन दिवस विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सीएमसीएस च्या संपूर्ण विद्यार्थी समुदायाने, कार्यक्रमाच्या सजावट आणि व्यवस्थापनात सहभाग नोंदविला.

महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यां सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. या उत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याच्या जयघोषात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, संस्थेच्या कोषाध्यक्षा शिल्पा जाजू, प्राचार्य रितेश चांडक यांनी गणेश उत्सवाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. गणेश उत्सव यशस्वी करण्याकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...