आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा:वेदधारिणी विद्यालयात गणेशोत्सव उत्साहात

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या युगाचे आवाहन झेलत, रूढी परंपरा या नविन संकल्पनेद्वारे साकारण्याचे संस्काराचे सिंचन करणे त्याच बरोबर अतिशय बहुमोल अशा वेळेचे भान ठेवून आपल्या स्वास्थ्याबरोबरच पर्यावरणाला जपणे हा संस्कार बालमनावर अधिक परीणामकारक होऊ शकतो. स्थानिक ‘वेदधारिणी विद्यालय’ पिंपळगाव, यवतमाळ येथे गेल्या कित्येक वर्षांपासून विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही गणेश चतुर्थीला शाळेचे मुख्याध्यापक निरज डफळे याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जलाशयात विसर्जित केल्यामुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हरीत सेना विभागाचे प्रभारी रवींद्र वझाडे याच्या मार्गदर्शनात शाडूच्या लाल माती पासून मूर्ती बनवल्या. शाळेतील धारणी सुर्यवंशी, प्रणाली वरठी, मानसी पाटील, वैष्णवी मेंढे, गौरी आत्राम, सलोनी लोखंडे, वेदांत इंगळेकर, स्मिता गलांडे, कोमल कार, वैष्णवी मिसाळ, खुशी कुटे, अंजली माळकुटे, मानस भोयर यांनी बाप्पाच्या आकर्षक मूर्ती तयार करून त्यांना नैसर्गिक रंग दीले. या वर्षी अशा प्रकारे निर्मित मूर्तीची स्थापना शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी आपल्या घरी केली. गौरी गणेशाच्या दहा दिवसाच्या काळात विद्यार्थी अभ्यासापासून दुरावू नये, या उद्देशाने शाळेच्या गणित शिक्षिका विद्या पठाडे दुर्वाकुंर गणित प्रकल्प राबवतात. शाळेतील सर्वच विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी असतात.

गणेशोत्सवाच्या काळात बाजारात पूजेच्या, शोभेच्या वस्तू आणण्याची झुंबड उडते आणी कॅरी बॅगची मागणी वाढते. प्लास्टीकच्या बॅगचे दृष्ट चक्र थांबवण्यासाठी शाळेच्या शिक्षिका शिवानी घोम यांनी वर्तमान पत्रे विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून कागदी बॅग बनवून त्यावर सुंदर विचार लिहीले. त्याचबरोबर कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. पर्यावरण वाचवण्यासाठी झाडे लावण्याचा व संवर्धन करण्याचा संकल्प केला. या गणेशोत्सवाची सांगता होते ती गणेश विसर्जनाने निर्माल्य जलाशयात विसर्जित करण्याची प्रचलित पद्धत आहे. या सर्वांना प्रतिबंध घालण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक नीरज डफळे, मिनाक्षी डफळे यांच्या मार्गदर्शनात निर्माल्य गोळा रॅली काढली गेली. गणपतीच्या वेशातील वेदांत डफळे यांनी सर्वाँचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी निर्माल्य संकलित करून निर्माल्य कलशात टाकले. या निर्माल्य पासुन कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले सदर उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...