आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस ते आर्णीकडे जाणाऱ्या पुलाखालील कचऱ्याला अचानक रविवारी ८ वाजता आग लागली. या लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
दिग्रस आर्णी बायपास पुलाखाली असलेल्या कचऱ्याला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीची माहिती मिळताच मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदूरकर यांनी अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आणल्याने आजूबाजूला असलेल्या नगराचा धोका टळला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायरमॅन आश्विन इंगळे, सागर शेळके, अ. नासिर, रोहन पवार, आसिफ खान, सहदेव उघडे यांनी अथक परिश्रम घेतले.
तहसील निवडणूक विभागालाही आग, साहित्य व फाईल जळाल्या दिग्रस तहसीलमधील निवडणूक विभागाला आग लागल्याने खोली मधून धूर निघत असल्याचे शिपाई अरुण मनवर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तहसीलदार सुधाकर राठोड यांना माहिती दिली असता तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले असून या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य व फाईल जळाल्या आहे. ही घटना सोमवारी दि. २ मेला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.