आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीन वर्षांत गॅस सिलिंडर 296 रुपयांनी महाग; वस्तूंची महागाई आवाक्याबाहेर जात असल्याने अनेकांची खरेदीवर मर्यादा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे दर ७३७ रुपये होते. आज हेच दर एक हजार ३३ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. शिवाय गॅसवर मिळणारे अनुदानही दोन वर्षांपासून मिळत नसल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे.

दरवर्षी तोंड वर काढत असलेली महागाई आणि त्या तुलनेत वाढत नसलेले उत्पन्न यामुळे घराचे मासिक बजेट कसे बसवायचे? असा मोठा प्रश्न दर महिन्याला गृहिणींसमोर उभा रहात आहे. सर्वसामान्यांच्या उत्पन्नाला मर्यादा असून त्यापेक्षा अधिक पैसा घरात येत नाही, त्यामुळे चौकटीत राहूनच त्यांना मासिक खर्च करावा लागतो.

मात्र, पेट्रोल-डिझेल, किराणा, एफएमसीजी वस्तू, खाद्यतेल, भाजीपाला या सगळ्याच वस्तूंची महागाई आवाक्याबाहेर जात असल्याने अनेकांना खरेदीवर मर्यादा आणाव्या लागल्या आहेत. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे दर वाढले आहेत. १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलिंडरची किंमत १ हजार ३३ रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे तारेवरची कसरत करून समाजातील मोठा घटक जीवन कंठत असल्याकडे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...