आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हर घर दस्तक मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण करा ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आरोग्य विभागाला सूचना

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर दस्तक मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे, यात १२ ते १७ वयोगटातील मुलं, जेलमधील कैदी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यावर विशेष लक्ष केद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. हर घर दस्तक मोहिम - २ राबवण्याबाबत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, नगर परिषदेचे डॉ. विजय अग्रवाल, रेडक्रास सोसायटीचे जलालुद्दीन गिलानी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी लसीकरण प्रलंबित रुग्णांना कोविड लस सुरक्षीत असून ती घेण्यात यावी असे प्रिस्क्रीप्शनवर लिहून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शाळा नियमित सुरू होण्यापुर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण व्हावे याकरिता फक्त विद्यार्थ्यांसाठी शाळेत लसीकरणाचे विशेष कॅम्प घेण्याचे नियोजन करण्याचे सूचना देण्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...