आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पहूर सोसायटीच्या अध्यक्षपदी घनश्याम वैद्य; उपाध्यक्षपदी सुरेश कोडापे यांची निवड

बाभुळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था पहूर येथे दि. १६ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा करिता काँग्रेसचे लक्ष्मण आखरे, राजकुमार पत्रे, गजानन अजमिरे यांचे नेतृत्वात सभा घेण्यात आली. अध्यक्ष पदा करिता घनश्याम वैद्य तर उपाध्यक्ष पदा करिता सुरेश कोडापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडणुकीकरिता दिनेश मल्हाळ, गुणवंत जिरापुरे, विलास चांबटकर, अक्षय चरडे, जीवन आंबीलकर, वासुदेव बेलवाई, गजानन वाघमारे, पवन गुगुळकर, दिलीप आखरे, राजू जिरापुरे, धीरज धुर्वे, अमृत मोहोकार, प्रवीण डेहनकर, भानुदास बावणे यांनी परिश्रम घेतले. संचालक मंडळात राजू पत्रे, गुणवंत जिरापुरे, गजानन अजमिरे, कल्पना वाघमारे, गीता बेलवाईक यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...