आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने चिरडले:घुग्गुस  रस्त्याची डागडुजी करणाऱ्या कामगारांना भरधाव ट्रकने चिरडले; दोन जागीच ठार तर तीन गंभीर जखमी, वाहन चालक पसार

वणी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घुग्घुस- वणी राज्य महामार्ग क्रमांक सातवरील पुनवट गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने पाच मजुरांना चिरडले. यात महादेव बालवटकर, राजू मिलमिले हे दोघे ठार झाले. सुरेश जुनघरी, सतीश गेडाम व अन्य एक मजूर गंभीर जखमी झाले.

ही घटना शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा पुनवट येथे बुधवार दि. ४ मे रोजी दुपारी घडली.वणी घुग्गुस मार्गावरील पुनवट प्रवासी निवाऱ्याजवळ आयव्हीआरसीएल कंपनीचे कामगार रस्त्याची डागडुजी करीत होते. या कंपनीने वणी घुग्गुस रोडचे काम केले असून रोडच्या देखभालीचे काम कंपनीकडून करण्यात येते. बुधवारी रोडला पडलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्याचे व रस्त्याच्या दुभाजकामधे वाढलेल्या झाडाझुडपांची कापणी करण्याचे काम सुरू होते.

भरधाव आलेल्या एमएच ३१, एफसी ६३९९ क्रमांकाच्या ट्रकने काम करीत असलेल्या कामगारांना चिरडले. या अपघातात दोन कामगार जागीच ठार तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. वर्दळीच्या या रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांसाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरविली गेली नसल्याने त्यांना आज आपला जीव गमवावा लागला. कोळसा वाहतुकीची सुसाट वाहने या मार्गाने धावत असतात.

त्यामुळे काम करतांना रोडवर सुरक्षा कठडे लावणे जरुरी असतांना अशी कोणतीच सुरक्षा कामगारांना पुरविली गेली नाही. या अपघातातील गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. अपघातात ठार दोन्ही कामगार कारंजी जवळील काठोडा गावातील असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...