आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांना नोटबुक भेट एक स्तुत्य उपक्रम ; शिक्षणाधिकारी सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर केंद्र बोटोणी व कुंभा शिक्षक व केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे आपण कुणी देणं लागतो या भावनेने दोन्ही केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी नोटबुक भेट दिले हा स्तुत्य उपक्रम असे उद्गार नुकतेच बोटोणी आश्रमशाळा येथे आयोजित नोटबुक वितरण व शिक्षण परिषद कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी गौरवोद्गार काढले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शा. व्य. समितीचे मोहन मडावी तर प्रमुख पाहुणे म्हनुन कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष मधुकर काठोडे, गटशिक्षणाधिकारी अनिल राऊत, विस्तार अधिकारी नरेंद्र कांडुरवार, केन्द्रप्रमुख प्रदीप रामटेके, शासकिय आश्रम शाळेचे प्राचार्य राजसिंह राठोड उपस्थित होते.

प्रथमतः पाहुण्याचे हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आयोजकाकडुन मान्यवरांचे शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. बोटोणी शाळेने स्वागत गीत तर जळका शाळेच्या विद्यार्थ्यांने देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. या प्रसंगी शिक्षणाधिकांऱ्यांच्या हस्ते कुंभा केंद्राला ५२६ तर बोटोणी केंद्रातील ५६१ विद्यार्थांना ३० हजार किमतीचे नोटबुक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रदीप रामटेके, संचलन संतोष किनाके तर आभार विस्तार अधिकारी नरेंद्र कांडुरवार यांनी केले. कार्यक्रमाला दोन्ही केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका उषा देवी भगत, किशोर ताटकोंडावार, दिवाकर राऊत, मनिष मोडक, राखी नैताम, उषा कनाके यांनी परिश्रम घेतले.

१ हजार ८७ विद्यार्थांना नोटबुक वितरीत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या पार्श्वभुमीवर शिक्षणाधिकांऱ्यांच्या हस्ते कुंभा केंद्राला ५२६ तर बोटोणी केंद्रातील ५६१ विद्यार्थांना ३० हजार किमतीचे नोटबुक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला दोन्ही केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...