आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमुक्ती द्या:झोपडपट्टीवासीयांना करमुक्ती द्या; गुरुदेव युवा संघाची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेने नुकतेच कर मूल्यांकन जाहीर केले. मात्र यात झोपडपट्टीधारकांना करमुक्ती द्या, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केली.

कररूपी रकमेतून नगर पालिका जनतेला सेवा देता. जणू शहराचे पालकत्वच पालिकेकडे आहे. त्यामुळेच ते वीज,पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता, साफसफाई आदी सेवेवर कर आकारणी करते. नगर पालिकेने नुकतेच आपले कर मूल्यांकन जाहीर केले. मात्र यात गोरगरिबांना वगळले नाही वा सवलत सुद्धा दिली नाही. जे ५०० स्क्वेअर फूट जागेवर घर बांधून राहतात त्यांना मुंबई महानगर पालिकेने करमुक्ती दिली आहे.

त्या धर्तीवर यवतमाळ शहरातील झोपडपट्टी धारकांना करमाफी देण्यात यावी, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांच्याकडे निवेदनातून केली. कोरोनाचे अनिष्ट परिणाम अनेकांवर पडले. त्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला. पैशाअभावी त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. तेव्हा त्यांची ही परिस्थिती विचारात घेता नगर पालिकेने अशा नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना करमुक्ती द्यावी, अशी मागणी केली आहे.

कर आकारणी मात्र सुविधा नाही
नगर पालिकेकडून वेगवेगळ्या सेवांवर कर आकारला जातो. मात्र त्या तुलनेत नगर परिषदेकडून सुविधा पुरविल्या जात नाही. शहरातील २८ प्रभागात असणाऱ्या शौचालयाचे उदाहरण देता येईल जे देखभालीअभावी गचाळ होत चालले आहे. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यानंतरच कर आकारणी वसूल करावी, असे गुरुदेव युवा संघाकडून सांगितले जात आहे.

मालमत्तेचा वाद झाल्यास अडचण
मालमत्तेचा वाद झाल्यास मालमत्तेची मालकी सिद्ध करण्यासाठी मालमत्ता कर पावती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परिणामी, जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करतो, तेव्हा मालमत्तेचे टायटल नगर पालिकेच्या रेकॉर्डमध्ये अद्ययावत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कर भरावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...