आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सेवा योजना:गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या‎ रासेयो निवासी शिबिराचा समारोप‎

उमरखेड‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गो. सी. गावंडे महाविद्यालय येथील‎ राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी‎ शिबीर दत्त ग्राम नागेशवाडी येथे दि.‎ २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान‎ घेण्यात आले.‎ या सात दिवसात विविध उपक्रम‎ राबवण्यात आले. दि. ४ मार्च रोजी‎ शिबिराचा समारोप कार्यक्रम घेण्यात‎ आला. या समारोप‎ कार्यक्रमाच्याध्यक्ष प्रा. डॉ. डी. व्हि.‎ तायडे व कार्यक्रमासाठी प्रमुख‎ अतिथी म्हणून पोलीस सहाय्यक‎ निरीक्षक सुजाता बनसोड उपस्थित‎ होत्या.‎ समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी‎ सात दिवसात केलेल्या‎ कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेले‎ अनुभव कथित केले.

निरोप‎ समारंभाचे संचालन व आभार‎ आरती रंधे व आरती माटाळकर या‎ विद्यार्थिनींनी केले, स्वागत गीत‎ वैष्णवी ताकतोडे व लावण्या‎ अनासाने ज्यांनी केले. राष्ट्रीय सेवा‎ योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सात‎ दिवसाच्या विशेष शिबिरातील‎ कार्यक्रमात विविध प्रकारचे‎ कार्यक्रम घेतले‎ मुख्यतः टेकडीवरील मंदिराची‎ साफसफाई गावातील मुख्य‎ मंदिरातील साफसफाई बंधारा‎ बांधण्याचे काम व जिल्हा परिषद‎ शाळा परिसर साफसफाई व‎ शाळेसमोरील रस्त्यावरची घाण‎ साफ करणे इत्यादी विविध प्रकारचे‎ कामे राष्ट्रीय सेवा योजनेच्या गावंडे‎ महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी‎ आनंदाने केली. गावंडे‎ महाविद्यालयातील प्राचार्य‎ माधवराव कदम तसेच सर्व‎ प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी‎ तसेच यवतमाळ जिल्हा अखिल‎ कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम‎ देवसरकर व सचिव यादवराव‎ राऊत यांच्या मार्गदर्शनात व यांच्या‎ शुभेच्छांनी सर्व कार्यक्रम‎ नियमितपणे पार पडले.‎

बातम्या आणखी आहेत...