आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदीपक भरारी‎:फ्लोअरबॉलपटूंना राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल‎

यवतमाळ‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ‎ मधील चौक स्टेडियम येथे १० ते १३ ‎नोव्हेंबर दरम्यान झालेल्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर‎ मुलीच्या फ्लोअर बॉल अजिंक्यपद ‎ ‎ क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यात‎ उत्तर प्रदेश संघाचा महाराष्ट्र राज्य ‎ ‎ मुलींच्या संघांनी तीन-एक गोलनी मात करीत गोल्ड मेडल पटकावून ‎नावलौकिक केले.‎ या सुवर्णपदक संघात यवतमाळ‎ जिल्हा फ्लोअर बॉल‎ असोसिएशनच्या पाच मुलीचा‎ मोलाचा वाटा होता.

त्यात‎ एससोएस ची युगांती नरेंद्र सिंग‎ चौहान, फ्री मेथॉडिस्ट स्कूलची‎ ईशा चंद्रशेखर कुंभलकर, राज‎ इंग्लिश स्कूलची आकांक्षा गणेश‎ खंदरकर, जॉयन्ट्स इंग्लिश‎ स्कूलची पूनम वीरेंद्रसिंग चौहान,‎ लॉन्यस इंग्लिश स्कूल वणीची‎ सानिया इंद्रपाल कावडे या‎ कौशल्यवंत खेळाडूनी राष्ट्रीय‎ पातळीवर सुवर्णमय भरारी घेवून‎ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाच्या‎ इतिहासात नाव कोरून नावलौकिक‎ केले.

या गुणवंत खेळाडू यशाचे‎ श्रेय राज्य संघटनेचे अध्यक्ष‎ आमदार जगन्नाथ शिंदे, सचिव‎ रवींद्र चौथवे, दीपक वाडे, जिल्हा‎ असोसिएशनचे अध्यक्ष चिंतामण‎ पांडे, उपाध्यक्ष मनोज येन्डे, सचिव‎ जितेंद्र सातपुते, प्राचार्य डॉ. दुर्गेश‎ कुंटे, देवेंद्र भोयर, सचिन भेंडे,‎ दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त डॉ.‎ उल्हास नंदूरकर, जिल्हा क्रीडा‎ अधिकारी नंदा खुरपुडे, तालुका‎ क्रीडा अधिकारी सचिद्र मिलमीले,‎ प्राचार्य नरेंद्र सिंग चौहान, प्राचार्य‎ प्रशांत गोडे, अमोल बोदडे, आशिष‎ फाले, एम. एन. मीर, अजय‎ मिरकुटे, निलेश तायडे, क्रीडा‎ शिक्षक संजय कोल्हे, प्रतिक‎ तडस, अवधूतवाडी पोलीस‎ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक‎ स्वप्निल निराळे, ऋषिकेश पुरी,‎ तुषार शेळके, नाझीया मिर्झा,‎ सुहानी चनेकर व आई वडील यांना‎ देतात. या खेळाडूचे जिल्हा क्रीडा‎ क्षेत्रातून कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...