आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक‎:कॉलेज ऑफ फार्मसीला अविष्कार स्पर्धेत सुवर्णपदक‎

दारव्हा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ‎ अंतर्गत बी.फार्म महाविद्यालयाच्या द्वितीय‎ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विदर्भस्तरीय अविष्कार‎ स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल मार्फत‎ दि. १० डिसेंबर रोजी वर्धा येथे बजाज‎ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार‎ पडली.

या स्पर्धेत देवेश महाकाल या‎ विद्यार्थ्यांचा जंगली जनावरांना‎ पळवण्यासाठीच्या यंत्राला सुवर्णपदक देऊन‎ गौरविण्यात आले व त्याची निवड राज्यस्तरीय‎ स्पर्धेसाठी करण्यात आली. तसेच प्रज्ज्वल‎ वानखडे यांच्या ऑरगॅनिक फार्मिंगसाठी‎ उपयोगी पडणारे भूमी चिंतक लिक्विडला रौप्य‎ पदक देऊन गौरविण्यात आले व त्याची निवड‎ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. गौरव‎ पंडित या विद्यार्थ्यांच्या लाइटिंग टी-शर्ट‎ मॉडेलला रौप्य पदक मिळाले.

सदर तीनही‎ विद्यार्थी आपले मॉडेल दि. २४ डिसेंबर रोजी‎ होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत सादर‎ करणार आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे‎ सहाय्यक प्राध्यापक रजनी सोनोने, रोकडे,‎ आडे, नेमाडे, ताजने, राऊत, कसंबे, सुरज‎ भटकर, चिरडे, तिडके यांचे मार्गदर्शन‎ लाभले.सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक‎ संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, संचालक‎ राहुल ठाकरे, व्यवस्थापक अशोकराव ठाकरे,‎ प्राचार्य अविनाश जिद्देवार यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...