आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेक्टरी पंचनामे:गोर सेनेची तहसील कार्यालयावर धडक

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील विठाळा, आरंभी, साखरा, मोरखेड, आनंदवाडी, तिवरी प्लॉट व इतर गावातील स्मशानभूमी सौंदर्यीकरण व शेड, प्रतिक्षागृहाचे कामे तातडीने व्हावे, तालुक्यातील शेतीचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करुन हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये मदत द्या तसेच तालुक्यातील कांदळी सर्वे करून स्मशान भूमीसाठी जागा द्या या मागणीचे निवेदन गोरसेनेतर्फे निवासी नायब तहसीलदार डी. आर. डोमाळे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दि.१७ ऑगस्टला दिले आहे.

दिग्रस तालुक्यामधील विठाळा, आरंभी, साखरा, मोरखेड, आनंदवाडी, तिवरी प्लॉट या गावात सन १९४७ पासून स्वतंत्र मिळाल्याचे काळापासून आज पर्यंत सार्वजनिक स्मशानभुमीचे सौंदर्यीकरणाचे व शेडचे तसेच प्रतीक्षा गृहाचे काम अद्याप पर्यंत झाले नाही. तर आरंभी या गावात वन विभागाची जागा स्मशानभूमी करीता दिलेली नाही. त्यामुळे अनेक गावात भर पावसात अंत्यविधी करण्याची दुर्देवी घटना तालुक्यात होत आहे.

पावसाचे काळात शव घरात ठेवावे लागत आहे. अत्यंत गैरसोयीत अंतिम संस्कार करावे लागत आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होत आहे. तेव्हा तालुक्यातील विठाळा, आरंभी, साखरा, मोरखेड, आनंदवाडी, तिवरी प्लॉट व इतर गावातील स्मशानभूमी सौंदर्यीकरण व शेड प्रतिक्षागृहाचे कामे तातडीने करण्यात यावे, तसेच तालुक्यातील कांदळी या गावात आज पर्यंत सार्वजनिक स्मशान भूमीसाठी जागा नाही ती उपलब्ध करून द्यावी तसेच तालुक्यामध्ये या वर्षीच्या लांबलेल्या पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तर तोच दि.९ जुलै ते १२ जुलै २०२२ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतीचे व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आले असुन शेतकऱ्यांनी उसनवार कर्जाऊ रक्कम घेवून दुबार पेरणी केलेले पिकाचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दिग्रस तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झाला असुन अशा परिस्थितीत शेती पिकाचे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये शासकीय आर्थिक सहाय्य देण्यात यावे. तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून व सर्व्हेक्षण करून हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे गोर सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी सुभाष चव्हाण, राहुल राठोड ,लक्ष्मण राठोड, लखन राठोड, नितीन पवार,आकाश जाधव, विशाल चव्हाण,दिनेश राठोड, भीमराव जाधव, लखन चव्हाण, विजय पवार, आकाश राठोड, प्रवीण चव्हाण, राजेश चव्हाण सह गोर सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...