आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यावर चाकू ठेवून लांबवले चंदनाचे झाड:चोरट्यांच्या निशाण्यावर शासकीय निवासस्थान; २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल लंपास

यवतमाळ10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या शासकीय निवासस्थानातील चौकीदाराच्या गळ्याला चाकू लावून चंदनाचे दोन झाडे लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. तद्नंतर लगतच्या प्रादेशिक वनसंरक्षकांच्या निवासस्थानातील एका झाडावरसुद्धा चोरट्यांनी हातसाफ केला. दोन्ही झाडाची मिळून दोन लाख ६० हजार रूपये किंमत आहे. या प्रकरणी वनविभागाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, परंतू बांधकाम विभागाने वृत्तलिहीपर्यंत तक्रार दिली नव्हती. गेल्या दोन महिन्यातील चोरीची ही तिसरी घटना आहे.

गेल्या दोन महिन्यापासून शासकीय निवासस्थानातील चंदनाच्या झाडावर चोरटे हातसाफ करीत आहे. जून आणि जुलै महिन्यात घडलेल्या घटनांप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे, परंतू चंदन चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आलेच नाही. अशात प्रादेशिक वनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानातील चंदनाच्या झाडावर चोरट्यांनी बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हातसाफ केला.