आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:दत्त चौकात काळी टोपी जाळून राज्यपालांचा निषेध

यवतमाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. याविरोधात नाराजीचा सूर उमटत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे स्थानिक दत्त चौकात सोमवारी आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाने काळी टोपी जाळून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध नोंदवला तसेच प्रतिमांना जोडे मारा आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार अपमानजनक वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करतात. भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून या वक्तव्यांचा निषेध नोंदवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ता त्रिवेदी यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी काळी टोपी जाळून राज्यपाल भगतसिंह यांचा निषेध नोदविला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्व कमी करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केला. यावेळी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, संजय रंगे, चेतन शिरसाट, तुषार देशमुख, विनोद नेमाने, कल्पना दरवई, मंदा गाडेकर, सागर पूरी, लता चंदेल, अमोल धोपेकर, संदीप सरोदे, चंद्रकांत उडाके, सुधीर जिरकर, बिल्ला सोळंकी, सुभाष सोळंकी, सुधीर मेदळकर, रमेश भगत, दिपक सुकळकर, प्रसाद अवसरे, गिरीजानंद कळंबे, राजू नागरगोजे, दिनेश इंगळे, विनोद राऊत, गोलू मिरासे, संतोष राठोड यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार बहुजन महापुरुषांचा अपमान करीत आहे. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी सोमवार, दि. २१ नोव्हेंबरला शिवतीर्थ येथे राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राज्यपालपदावरून त्यांना हटवण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...