आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:पुसद येथील गोविंद नगर ट्रेडर्सला शॉर्ट सर्किटमुळे आग ; दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान

पुसद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळच असलेल्या गोविंद नगर येथील ट्रेडर्सच्या दुकानाला दि. ७ जुन रोजीच्या रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने उग्र रूप धारण करीत दुकानांमधील ठेवलेल्या साहित्यासह सिमेंटचे पोते जळून खाक झाले आहे. आगीमुळे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज ट्रेडर्सच्या मालकाकडून लावल्या जात आहे. संजय रा. वानखेडे असे शुभम ट्रेडर्स मालकाचे नाव आहे. गोविंद नगर स्थित असलेले शुभम ट्रेडर्सचे मालक हे कामापुरते उघडे करतात. त्यानंतर दुकानाला नेहमी शटर लावलेले असते. दुकानांमध्ये सिमेंटचे होते.शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाईन फिटिंगचे साहित्य, वेगवेगळी पाईप,दोन संगणक, लॅपटॉप, वजन मापन, काटा सह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे त्यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती कळताच ट्रेडर्सचे मालक वानखेडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पुसद नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात यश आले.ट्रेडर्सच्या आजु बाजूलाच घर असल्यामुळे परिसरात राहणाऱ्यामध्ये काही वेळेसाठी भीती निर्माण झाली होती.अग्निशमन दलाने वेळीच आग विझविल्याने सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...