आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित:जि.प. विकास आराखड्याबाबत राज्यस्तरीय प्रशिक्षण उत्साहात

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत समिती, जिल्हा परिषद विकास आराखड्याबाबत दि. २६ ते ३० जुलै दरम्यान यशदा पुणे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत निवड झालेले राज्य प्रवीण प्र शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देविदास ढगे, विशाल ठाकरे, लीना तुरकर, अर्चना जतकर यांचा समावेश होता.

या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकाची भूमिका जबाबदारी, प्रशिक्षणाचे पार्श्वभूमी, शाश्वत विकासाची संकल्पना, पंचायत समिती आराखडा तयार करणे, क्षत्रिय गट तयार करणे, योजनाचे एकत्रीकरण गरजांचे प्राधान्यक्रम निश्चित, पंचायत समिती आराखडा तयार करून महत्त्वाकांक्षी शाश्वत विकासाची १७ गोल व ९ संकल्पना साध्य करण्यासाठी रोजगार हमी योजना, मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज पोर्टल ग्रुपचे नियोजन कार्यकारी गटाची रचना, कार्य व नियोजन समिती कार्यकारी, गट प्रशिक्षण आराखडा, व्यक्ती विकास सामाजिक विकास निर्मिती इत्यादी विषयाचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये यशदा पुणे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प उपसंचालक बि. एम. वराळे यांनी पाच दिवस मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...