आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मारेगाव महाविद्यालयात 233 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; संघर्षातूनच घडत असते परिवर्तन

मारेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील असलेले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे सदैव ज्ञानदानाच्या कार्यात अग्रेसर राहिलेले आहे. मंगळवार, दि. १० मे रोजी महाविद्यालयात बी.ए., बी. कॉम व बीएस्सी मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. सदर सोहळ्यामध्ये तिनही शाखेच्या मिळून एकूण २३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे उपस्थित होते. मानवी जीवनात संघर्षातूनच परिवर्तन घडवून आणले जाते असे मत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. डॉ. शशिकांत आस्वलेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

प्राचीन काळातील भारतातील वैज्ञानिक विकास व प्रगतीचा इतिहास सुद्धा आपल्या भाषणातून सांगितला. या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ. अविनाश घरडे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील वेगवेगळ्या संधी सांगितल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन सोडनर व डॉ. विनोद चव्हाण यांनी केले. डॉ. आस्वले, परिचय प्रा. शैलेश कांबळे केला. तर प्रा. अक्षय जेनेकर यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. संदीप केलोडे, डॉ. विभा घोडखांदे, प्रा. बाळासाहेब देशमुख, डॉ. प्रवण कुलकर्णी, प्रा. राजश्री गडपायले, डॉ. मंजु परदेसी, डॉ. अनिल अडसरे, प्रा. शैलेश आत्राम, प्रा. रूपेश वांढरे, डॉ. नितेश राऊत, प्रा. स्नेहल भांदककर, डॉ. मीनाक्षी कांबळे, दीपक मनवर, रवी परचाके व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोलाचे प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...