आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचन चळवळ डळमळीत:दोन वर्षांपूर्वीचे अनुदान, तेही 50 टक्केच, 25 ग्रंथालये पडली बंद; ग्रंथालयांना गेल्या वर्षातील अनुदान मिळालेच नाही

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनांमध्ये वाचन चळवळ सक्षम करण्याची टिमकी वाजवणाऱ्या शासनाकडूनच चळवळीला डळमळीत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयांना गेल्या दोन वर्षांपूर्वीचे म्हणजे २०२० ते २०२१ आर्थिक वर्षातील केवळ ५० टक्के अनुदान शासनाने दिले आहे. उर्वरित ५० टक्के अनुदानाचा अजून पत्ता नाही. त्यात गेल्या आर्थिक वर्षाचा तर छदामही दिलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील २५ ग्रंथालये बंद पडली आहेत.

सध्या २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली नाही. यावर्षीचे केवळ ५० टक्के अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ३५३ ग्रंथालयांना एक कोटी १९ लाख ५७ हजार २४६ रुपये अनुदान वाटप केले आहे. उर्वरित ५० टक्के म्हणजे एक कोटी १९ लाख ९८ हजार २७६ रुपये अनुदान २०२२ वर्षातील मे महिला उजाडला तरी मिळाले नाही. याच वर्षातील अनुदान मिळाले नसताना २०२१- २०२२ या आर्थिक वर्षातील अनुदान मिळणार की नाही, याची शाश्वती नाही. त्यात चालु वर्षाचे अनुदानासाठी २०२४-२५ ची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...