आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:सोमनाथ कांबळे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

दिग्रस2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांचे कोरोना काळात निधन झाले होते. तेव्हा त्यांच्या निधनामुळे समाजासह इतरांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मंगळवार, दि. २१ जून रोजी त्यांची ४१ वी जयंती निमित्ताने सावंगा बु. येथे लहुजी शक्ती सेनेतर्फे अभिवादन करण्यात आले.

तालुक्याच्या लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात सोमनाथ कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोमनाथ कांबळे यांच्या केलेल्या समाज कार्यावर प्रकाश टाकला व त्यांच्या जयंती निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष सुदाम इंगोले, गोपाल तायडे, अमर इंगळे, शंकर तायडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...