आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे पिकाची मोठी हाणी:विभागीय महसूल आयुक्तांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; तात्काळ मदत करावी लागणार

ढाणकी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन आठवड्यापासून अतिवृष्टीच्या पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी हाणी झाली. अनेक गावांचा दिवस दिवस संपर्क तुटला काही गावांना तर पुराच्या पाण्याने वेढाही दिला. ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील अनेक पुल पावसाच्या पाण्यात खचली. अशा स्थितीत अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पूरग्रस्त भागाला नव्यानेच रुजू झालेले अमरावती विभागाचे आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दि. ३० जुलैला सायंकाळी ४ वाजता भेट देवून पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उमरखेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उमरखेडचे तहसीलदार आनंद देवूळगावकर, उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण कुमार वानखेडे, ढाणकी मंडळाचे मंडळाधिकरी सचिन फटाले, पटवारी डोंगरे, पटवारी शिवणकर, ढाणकी बिटरगाव मंडळाचे कृषी सहायक उपस्थित होते.

११ ते १३ जुलै दरम्यान सखल भागात पुराचे पाणी साचल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते हिरावून घेतले होते. या अस्मानी संकटाच्या ओझेने शेतकरी पूर्णता हतबल झाला होतो. जिल्हाधिकारी यांनी उमरखेड तहसीलदार आनंद देवूळगावकर यांना सूचना देवून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणचे अजूनही पंचनामे केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आयुक्तांपुढे नाराजी व्यक्त केली. तसेच दरवर्षी नाल्या काठच्या शेतकऱ्यांना पूराचा आर्थीक फटका सहन करावा लागतो. पुलाच्या उंचीची मागणी लावून धरली.

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
बिटरगाव जवळील नाल्यावर असलेला पूल अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने खचल्यामुळे नागरिकांना या पूलावरून येजा करणे जिकरीचे झाले आहे. या पुलाचे तात्काळ डागडुजी करावी. ढाणकी बिटरगाव हा रस्ता चाळणी झाल्याने प्रवाशांना वाहन चालवताना कराव्या लागणाऱ्या कसरतीचा पाढाही वाचावा लागला.

बातम्या आणखी आहेत...