आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक:बेचखेडा येथे उभारण्यात आली स्वराज्याची गुढी ; निगंनुर ग्रा. पं. कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

निगंनुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील निगंनुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवार, दि. ६ जून रोजी सकाळी ८ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक ग्राम स्तरावर भगवी गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन साजरा केला. मध्ययुगीन काळा मधील चतुर वर्ण व्यवस्थेला तिलांजली देऊन समता स्वतंत्र्यता बंधुता एकात्मता, धर्म निरपेक्षता जनतेमध्ये प्रस्थापित करून रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक ६ जुनं १९७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर यथाविधी पार पडला. प्रत्येक रंग हा निसर्गाचा अविष्कार असल्याने त्या रंगाकडे जातीये त्व भावनेने न बघता भगवा ध्वज त्यागाचे प्रगतीचे प्रतीक असल्याने सर्व ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये भगवी गुढी उभारून साजरा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असता त्याचे अनुपालन करीत सर्वत्र हा उत्सव गावातील, सरपंच सुरेश बरडे व उपसरपंच मेहेमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन, ग्रामपंचायत सदस्य ग्रा. प. कर्मचारी वृंद, गावातील नागरिक प्रमोद जैस्वाल, संदिप वाघमारे, मैनोदिन सौदागर, अमोल काळे, हजर होते. यावेळी राष्ट्रगीत, जय जिजाऊ जय शिवराय चा गजर लावण्यात आले तर काही ठिकाणी महाराष्ट्र गीत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...