आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेस्ट लेक्चरचे आयोजन:बिजनेस कम्युनिकेशनवर गेस्ट लेक्चर‎

यवतमाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाधवाणी फार्मसी महाविद्यालयात‎‘‘बिजनेस कम्युनिकेशन’या विषयावर‎ गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले‎ होते. महाविद्यालयाच्या श्रोतृगृहामध्ये ‎ ‎ आयोजित करण्यात आलेल्या या‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माधुरी चन्नावार‎ व प्रमुख वक्ते योगिता जेस्वानी, कॉर्पोरेट ‎प्रशिक्षक, यवतमाळ हे मंचावर उपस्थित‎ होते.‎ डॉ. माधुरी चन्नावार यांचे हस्ते पुष्प गुच्छ‎ देउन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.‎

योगिता जेस्वानी यांनी सॉफ्ट स्कील्स,‎ संवाद कौशल्य, रिज्युम राईटिंग, कव्हरींग‎ लेटर, इंटव्युव स्किल्स याबाबत मार्गदर्शन‎ केले. तद्नंतर डॉ. माधुरी चन्नावार यांनी‎ भविष्यात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण‎ उपक्रम राबवण्याचा माणस व्यक्त केला.‎ ह्या प्रसंगी महाविद्यालयामधील प्राध्यापक‎ आणि डी फार्म, बि फार्म व एम फार्म‎ अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठया संख्येने‎ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन‎ अमिशा सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन पुजा‎ देवाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेकरिता प्रा. परेश वाधवाणी व प्रा‎ प्रशांत गिरडकर यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...