आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पारवा येथे पोलिस भरती विषयी मार्गदर्शन वर्ग; प्रा. सचिन राऊत, प्रा. काजळे उपस्थित

घाटंजी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारवा परिसरातील इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरता पारवा पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस भरतीपूर्वी मार्गदर्शन आणि विविध स्पर्धा परीक्षांमधून नोकरीचे विविध क्षेत्र यांची ओळख व्हावी या करता विशेष स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. सचिन राऊत, प्रा. काजळे उपस्थित होते.

यावेळी पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण १०० विद्यार्थी- विद्यार्थीनी स्नेह संमेलनामध्ये उपस्थित होते. सन २०२२ साली इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रा. राऊत यांनी पोलीस भरतीची तयारी कशी करायची याबाबत माहिती दिली. परीक्षेचे टप्पे, मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षा याबाबत घटक निहाय महत्वपूर्ण माहिती दिली. प्रा. काजळे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रामाणिक कष्ट करून त्याचे निश्चित ध्येय प्राप्ती करू शकतात याकरिता मार्गदर्शन करून विद्यार्थी व उपस्थित पालक यांचे मनोबल वाढविले.

स्नेह संमेलानास घाटंजी येथील तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, अरूण कांबळे यांनीही विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. ग्रामिण भागातील विद्यार्थी कष्ट करून नोकरी मिळवू शकतो याचे उदाहरण म्हणून घोटी येथील माध्यमिक शिक्षक संजय आत्राम, रा. बिलायता यांनी त्यांचे जिवन प्रवास उपस्थितांपुढे उलगडून दाखविला. आगामी पोलीस भरती सन २०२२ ची पूर्व तयारी याकरिता योग्य वेळी मिळालेले तज्ञांचे मार्गदर्शन हे आदिवासी बहूल लोकसंख्या असलेले घाटंजी तालुका मधील ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनो व पालकांना अत्यंत महत्वपूर्ण व समाधान देणारे वाटले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ठाणेदार विनोद चव्हाण, सावळी दूर क्षेत्र प्रभारी अधिकारी सपोनि गजानन गजभारे, पोलीस अंमलदार ससाणे, चौके, शेजूळकर, राठोड, जाधव, पांडे, मुंढे, मेश्राम, गिनगुले, सलाम, वाघमारे, चालक राहूल राठोड, राजू दादेवार, मपोशी रंजना वाटगूरे यांनी मेहनत घेतली.

बातम्या आणखी आहेत...