आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:अभियांत्रिकी महाविद्यालयात‎ स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय अभियांत्रिकी‎ महाविद्यालयात बुधवार,‎ विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यक्तिमत्व‎ विकास व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन‎ कार्यशाळेचे आयोजन करण्यात‎ आले. एम. एम. ॲकॅडमीचे‎ संस्थापक संचालक मयूर मोगरे‎ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‎ विद्यार्थी दिशेपासूनच स्पर्धा‎ परीक्षांची तयारी करण्याचे फायदे व‎ ही तयारी कशी करावी? विद्यार्थ्यांना‎ घरी अभ्यास करूनही कशा प्रकारे‎ अधिकारी बनता येईल? याबाबत‎ मोगरे यांनी माहिती दिली.

चांगल्या‎ व्यक्तिमत्त्वामुळे आयुष्यात होणारे‎ लाभ तसेच स्पर्धा परिक्षेत यशस्वी‎ होण्यासाठी आवश्यक तयारीबाबत‎ मयूर मोगरे यांनी विद्यार्थ्यांचे‎ प्रेरणादायी सत्र घेऊन सखोल‎ मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास‎ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎ मिळाला. या कार्यक्रमास शासकीय‎ अभियांत्रिकी महाविद्यालय‎ यवतमाळ येथील अधिकारी,‎ कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...