आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन; उत्पादन वाढीबाबत माहिती

यवतमाळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धानोरा येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथील शिवनकर, नाकले, नगराळे, खडसे, घोडे, आडे, यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. उत्पादन वाढीबाबत माहिती दिली. व बिज प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली.

राष्ट्रीय बीज कार्यक्रम अंतर्गत अनुदान कसे घ्यायचे यांची संपुर्ण माहिती दिली. या करता मार्गदर्शन म्हणून प्रमुख लाभलेली व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य कडू, विषयतज्ञ डॉ. प्रतीक बोबडे, विषयतज्ञ प्रा. के. टी. ठाकरे, डोंगरवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावातील शेतकरी विलास चोरमले, संतोष झिंझे, विनोद चोरमले, प्रगती झिंझे, संतोष नगदिवे, जनार्दन वरखेडे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...