आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरिता वित्तीय साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य विभाग आक्यूएसी व रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर अभियानाचे आयोजन केले हाेते. अध्यक्षस्थानी चंद्रकांत रानडे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजकुमार जयस्वाल, पौर्णिमा नाबियर, सर्वेश कलेजवार उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी प्रास्ताविकात वित्तीय साक्षरता ही आजच्या बदलत्या युगाची गरज असून, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना पैसा व्यवस्थापनाचे महत्त्व समजले पाहिजे, असे सांगितले.
राजकुमार जयस्वाल यांनी आरबीआयचा इतिहास व भारतीय चलनाची वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन केले. पौर्णिमा नाबियर यांनी भारतीय रिझर्व बँकेत कार्य करण्याची संधी यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत तोलवाणी यांनी केले, तर आभार प्रा. योगिता बोरा यांनी मानले. कार्यशाळेला दोनशे विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवली.प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांसाठी आरबीआय नागपूरतर्फे माहिती पुस्तक, नोंदवही व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, प्रा. डॉ. कविता तातेड यांच्या मार्गदर्शनात प्रा. महेश महाजन, प्रा. सतीश देशपांडे, प्रा. पद्मश्री बेळगावकर, प्रा. विनोद चव्हाण, प्रा. प्रतीक्षा लाहोटे, प्रा. सौरभ वगारे, नितीन वालदे, गोलू चौधरी, प्रीती तिवाडे यांनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.