आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी १५ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून दोन वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले होते. पहिल्या वर्गातील मुलांनी शाळेचे तोंडही न पाहिल्याने त्यांनी शिक्षणाची गोडी लागली नाही. त्यामुळे पालकांवर मुलांना त्याच वर्गात शिकू द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पहिली व दुसरीतील मुलाचे पालक शिक्षकांना विनवणी करत असल्याचे दिसून येत आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष संपल्या नंतर कधी १ मे चा दिवस उजाडतो. व आपले पाल्य पास होऊन पुढच्या वर्गात प्रवेशाला पात्र ठरते याची उत्सुकता लागलेली असायची. पण कोरोना महामारीत सतत दोन वर्षे शाळा बंद असल्याने याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते वर फार परिणाम झाला. विशेष म्हणजे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे तोंडही पाहायला मिळाले नाही. एकही दिवस शाळेत न गेल्याने विद्यार्थ्यां मध्ये शाळेची गोडी निर्माण झाली नाही. त्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले नाही.
कोरोनाच्या काळात मुले मोबाइलच्या आहारी गेली. पायाच मजबूत नसेल तर अश्या मुलांना पुढच्या वर्गात पाठवून उपयोग काय अशी भीती पालकांना वाटू लागली आहे. कोणताही अभ्यास न करता मुले पुढच्या वर्गात गेली तर ती ढ राहुन प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गात जातील मात्र दहावीला त्यांना बोर्डाच्या परीक्षेत फटका बसेल त्यामुळे आणखीन एक वर्ष आपले मुलं त्याच वर्गात राहिले तर पाया मजबूत होईल असे पालकांना वाटत आहे. या आशेतून पालक शाळेची पायरी चढून गुरुजी काहीही करा पण आमच्या मुलांना यावर्षी पहिलीतच ठेवा अशी विनवणी करतांना दिसत आहे. पण ऑनलाइन नोंदणीची अडचण असल्याने विद्यार्थ्यांना परत त्याच वर्गात ठेवता येत नाही.
यामुळे शाळेत येऊन मुलाला त्याच वर्गात बसू द्या अशी विनवणी करणाऱ्या पालकाची मात्र निराशा होत आहे.पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कळलेच नाही. त्यातच लहान वयात मोबाईल हाती आला. शिक्षणा ऐवजी मुलांना फेसबुक आणि यु ट्यूब, व गेम खेळण्याची वाईट सवय लागली. शाळेचे तोंड न पाहता हे विद्यार्थी दुसरी आणि तिसरीच्या वर्गात गेले आहे. पण पायाच कच्चा असल्याने भवितव्य पुढे काय असा प्रश्न पालकांना सतावतोय.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.