आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक कुटुंब सोडून देश सेवा:गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठवल्या राख्या

दिग्रस3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचं रक्षण करण्यासाठी आपले सैनिक कुटुंब सोडून देश सेवा करतात. पवित्र सण रक्षा बंधनाला सैनिक भावाची बहीण आतुरतेने वाट बघत असते. तर भाऊ बहिणीच्या राखीची. परंतु भावा बहिणीच्या या अतूट बंधनाच्या दिवशीही सैनिक भाऊ बहिणीला भेटायला जाऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन गुरुकुल शाळेचे अध्यक्ष डॉ. विवेक भास्करवार, मुख्याध्यापिका आबेदा शेख व सहकारी शिक्षकांमार्फत दरवर्षी “ एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम गुरुकुल शाळेत राबवून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना पोस्टाने राखी पाठविण्यात आला.सैनिक सीमेवर कर्तव्य बजावतात. आपल्या बहिणीची नेहमी रक्षा करतात.

तेव्हा गुरुकुल येथील विद्यार्थी यांनी सैनिकांसाठी “एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम राबवून राख्या तयार करून पाठवल्याने सैनिकाबद्दल प्रेम आदर व्यक्त केले. या प्रसंगी सैनिक नीलेश तायडे या जवानाचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम, उपमुख्याध्यापक शरीफ शेख, पर्यवेक्षक अनिकेत कोळसे, सय्यद शोएब, अभय जोशी, संदीप शिंदे, सचिन गोंधळेकर, विद्या पुडके, दुर्गा शिंदे, जयश्री बेंद्रे, अमृता जुनघरे शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...